सावली ✍️

| | सावली | |


मायेनं पंखा खाली 

घेऊन निराधारांना कवेत 

गोळा  निर्मळ पाखरं 

एकवटली सारी संस्थेत. 


छत्र दिलं मनाने 

अन्न पुरवलं माऊलीने 

निराधारांची झाली आधार 

चिमुकल्याना सावरलं सावलीने. 


अनाथांना देऊ आधार 

उचलून आपण भार 

तोचि मानु जीवनसार 

मिळालंय आपल्याला उधार. 


सार्थकी लावु जीवन 

करू मदतीचं दान 

विश्वात कार्य तेच महान 

मिळवु जनात संन्मान. 


चुमुकली सामावली सावलीत 

ओंजळ भरू पायलीत 

नगरी नगरच्या वेशीत 

मदत भेट देऊ राशीत... 


प्रदीप पाटील 

गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव 

©️®️

नगर जवळ सावली संस्थे साठी लिहलेलं काव्य. त्यांनी लिहण्यास सांगितले संस्था विषयी लिहा म्हणून मनातून आलेले भाव.

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे