विद्रोहाची आग
| | विद्रोहाची आग | |
प्रवाह विरुद्ध पोहून उरतो
देत ज्ञान समाजात फिरतो
वाटतं मनाविरुद्ध करतो
तरी हा पुरून उरतो.
जळजळीत सत्य मांडतो
प्रसंगी सर्वाशी भांडतो
लेखनास धार देतो
कोळून विष अमृत बनवतो.
अन्याया साठी झगडतो
अत्याचारा विरुद्ध लढतो
मानवास एकत्र करतो
कुविचारास लांब पळवतो.
विद्रोह चांगल्या साठी
सोबत घेऊन काठी
थाप पडावी पाठी
सारं जनते साठी.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

Comments
Post a Comment