भाग्यशाली अण्णा... ✍️

 भाग्यशाली अण्णा... 


वेडू अण्णा यांचा जन्म शेतकरी कुटूंबात इंग्रज राजवटी चा काळ . लहान पण पासून शिक्षण गोडी असलेलं व्यक्तिमत्व अथक प्रयत्न करून शिक्षण घेतले. . शिक्षण मला वाटतं कुठं झालं माहिती नाही. पण काही दिवस शिंदखेडा येथे झालं असावं कारण गणपूर गावात फक्त मराठी शाळा होती. तद नंतर शिक्षण सुविधा नव्हती नंन्तर स्वर्गीय. अण्णा यांनीच गावात उच्च माध्यमिक शाळा अथक प्रयत्नातून आणली. त्या व्यतिरिक्त  गावात बऱ्याच  संस्था सुविधा त्यांनी आणल्यात अथक समाजसेवा व्रत कार्य होतं त्यांच त्यांच्या मुळेच गावाच्या विकासाला चालना मिळाली . अण्णा हुशार व्यक्तिमत्व शिकण्या साठी त्रास अनुभवला. शिक्षणाची गोडी होती म्हूणन तीन भावंडात एकटेच शिकलेत आणि शिक्षक  म्हूणन रुजू झालेत. तत कालीन त्यांना गावात पंचक्रोशीतील लोकं  त्यांचा मान सन्मान करतं असतं ..  नोकरी कुठं पण असली तरी गणपूर ते नोकरी ठिकाणी पायी प्रवास करतं. तत कालीन रस्ते कमीच. असले तरी मुख्य शहरा शहरा शी जोडलेली. त्यांचा नोकरीचा जास्तीत जास्त नव्हे सर्व  काळ गावाच्या बाहेर गावा पासून लांब गावा पासून दहा पंधरा किमी अंतरा वरच्या गावी गेलेला . शेवटची काही  जवळील भवाळे गावी नोकरी केली. ज्या ठिकाणी नोकरी केली त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक आणि त्या गावातील मुलांना शिक्षणाची गोडी लावली. गावात सुद्धा विविध उपक्रम राबवत. गावातील भांडण तंटे सोडवत. त्या गावाचा विकास कसा होईल तेच बघत. तत कालीन शिक्षक गावातील आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व असे. शिक्षक  शाळेतील मुला  सोबत गावाला  दिशा दाखवायचे काम करत असतं. त्यांचा शब्द प्रमाण मानला जातं असे. शिक्षक अन गाव असं आदर्श नाते असे गावा सोबत घट्ट नाड जोडली असे. एक अतूट नातं असे.  असा काळ.  तत काळी आण्णा  रोज पंधरा ते वीस किलोमीटर जाणं  नंन्तर परत येणं.  काटक शरीर कष्ट  करण्याची वृत्ती. पहाटे दोन तीन वाजता उठत आणि शाळा असलेल्या गावी जाण्यासाठी निघत असतं शाळा सुरु होण्या अगोदर तेथे पोहचत. अखंड नियम पहाटे लवकर उठून एकटे वाटचाल नियमित करतं संध्याकाळी. पाच ला शाळा सुटली कि रात्री घरी पोहचत. कधी काही अडचण असली पाऊस असला कि तेथे शाळेतच मुकामी राहत असतं.रात्री  पहाटे जातं असतील ते आठवून मला तर आता सुद्धा अंगावर काटे येतात. रात्री एकटं  अंधारात निघत असतं आडमार्गाने रोजची पायवाट. कीर्द झाडी अंधार  कुठं पिका मधून मार्ग काढत चालत असतं. रोजचा नित्य नियम त्यांच्या ठाईं  भीतीचा लवलेश नव्हता. ते नोकरी करतं  असतांना घरी पत्नी लहान लहान मुलं यांना पहाटे सोडून जातं असतं. त्या वेळी गावात लाईट काय असते हे माहिती नव्हती दिवा , कंदील, बत्ती चा काळ  पारतंत्रातील इंग्रज राजवट वेळेला महत्व ठाईं भरलेलं. गावात  घर होतं त्या वेळी असं गावाच्या मध्यांनी  घर पावसाचे दिवस म्हणून त्या दिवशी नेमके आण्णा नोकरी ठिकाणी मुकामी राहिलेले होते..घरी पत्नी मुलं एकटी.   त्या दिवशी  घरात धान्याची पोती भरलेली होती.घर मोठं असुन सुद्धा घरात धान्य गोणी मुळे अडचण होती.   एका बाजूला त्या पोत्यांच्या थप्पी ला लागून  लगत मुलं त्यांची पत्नी  द्रौपदा ताई आजूबाजूला खाटीवर झोपली असतील. असंच पहाटे नित्यनियम म्हणून पत्नी द्रौपदाबाई पहाटे उठल्या . घरातील दिव्याची  वात मोठी केली . पहातात तर काय त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. धान्याच्या गोण्या वर भला मोठा साप (सर्प ) गोल भिंडोळे करून बसलेला होता फण काढून.जसं काही धन  सांभाळत होता.  त्याच भव्य रूप रूप तर केवढं होतं गोल भिडोळ दोन तीन  फुटांचं उंच असावं. त्यास  पाहून अंगातील त्राण उरले नसतील त्या माउलीचे पण त्यातून सावरत द्रौपदाबाई यांनी हळूच घराचा दरवाजा उघडला आणि शेजारी ओरडत सांगितलं घरात मोठा साप आहे धान्याच्या  पोत्यावर.  मुलं झोपलेत घरात. मुलं लहान लहान  बातमी वाऱ्या सारखी गावात पसरली गाव गोळा झालं सारं. दारातूनच सापाला पाहून  कुणाची हिम्मत होईना घरात घुसायला पण त्यात दोन तीन जणं यांनी धाडस केलं आणि आत शिरली हळूच एक मुलाला उचलले समोर धान्याच्या  पोत्यावर भला मोठा नाग फण काढून बसलेला. अगदी दोन तीन फुटावर  त्याच्या समोर मुलास उचलले दुसऱ्या कडे दिलं दुसऱ्या मुलास उचललं बाहेर दिले मुलीस उचलून बाहेर दिले असं करतं सुखरूप मुलं बाहेर आलीत सर्प सोमोर बसून इकडे तिकडे फण करतं होता.जसं सारं दृश्य पाहत होता.  पण कुठलीही हालचाल नाही. मुलं बाहेर आली पण आता गावा समोर प्रश्न पडला या भल्या मोठया सापाला मारायचं कसं.या प्रश्नातून मार्ग काढला गावात पाटील यांच्या कडे बंदूक परवाना होता. त्यांनी बंदूक आणली   आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सर्प मारण्यात आला. या वरून अंदाज येतो कि सर्प केवढा मोठा असेल. कारण तत कालीन लोकं निडर नं घाबरणारे होते.    अश्या गावाच्या मध्यभागी सर्प कसा आला असेल आणि सारे रात्री झोपलेली असतांना घरात निवांत जसं सर्वांच्या रक्षण साठी, वा धन रक्षण करत  घरात बसलेला असंच.या वरून  हि गोष्ट आण्णानं चे वडील संखे चुलत बंधू स्वर्गीय.  श्री दगाजी पाटील यांचे किराणा दुकान होते  त्यांच्या दुकानातील कामकरी श्रीराम पाटील यास हि गोष्ट  दोन तीनदा सांगितली आणि म्हणत आमच्या सर्व भावंडात भाग्यवान होत मास्तर अण्णा .  श्रीराम पाटील यांनी  मला कहानी सांगितली ती आपणा समोर सादर केली.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

Comments

  1. व्यक्तीचित्रण खुप छान जमते सर 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे