तरुणाईच्या वळणावरती
| | तरुणाईच्या वळणावरती | |
आईच्या खुशीत बालपण
वडिलांच्या आज्ञेत लहानपण
बाबांच्या गोष्टीत संस्कार
गुरूंच्या शिकवण्यात शहाणपण.
जाते मजेत बालपण
खेळण्यात समजत नाही पण
मित्र ठेवता जाण पण
येता तरुणाईच्या उंबरठ्यावर पण.
भरकटता कधी विचार पण
सोडु नये सदाचार पण
ठेवावी कुटूंबाची जाण पण
आठवावे विचार आपण पण.
हेच वय घडण्याचे
आयुष्यात पुढे पळण्याचे
आधार स्तंभ होण्याचे
कुटूंबास आधार देण्याचे.
देशाची मान उंचावण्याचे
गगन भरारी घेण्याचे
नको धूम्रपान घेण्याचे
लफड्यात नाही पडण्याचे.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️
चांगला संदेश...लिखाणातुन .
ReplyDelete