|| ठेव जाणीव याची || जाण आई वडिलांची ||

 विषय :-  ठेव जाणीव याची 

कविता :- जाण आई वडिलांची 


 सारं सोसलं पोटात 

दूध पाजलं ओठात 

फिरले तूझ्या काठीत 

घेऊन पदोपदी मिठीत. 


सोसले चटके उन्हात 

ओझं घेऊन पाठी 

 सारं तुझ्याच साठी 

 बसवलं तुलाही पाठी.


अ ते ज्ञ लिहणं 

बोलणं  चालणं  शिकवलं 

घडवलं तुला माणसात 

सर्व तुझ्यासाठी मिळवलं. 


करता करता तूझं 

आली तोवर साठी 

 लागली त्यांनाच  काठी 

आता मार तु मिठी. 


त्यांनी केलं आईवडिलांचे 

हट्ट पुरवत तुझे 

पांग फेड त्यांचे 

म्हणतील तुलाच राजे. 


ठेवशील जाण त्यांची 

कीर्ती तुझीच गाजे 

पाहून रूप तुझे 

मुलं करतील तुझे. 


पेराल तसं उगवेल 

सृष्टी तशीच सजे 

मनात ठेवा ओळ 

व्हा मनाचे राजे. 



प्रदीप पाटील ©️®️

गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव 

Comments

  1. खूप छान व भावस्पर्शी रचना सर. शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. अत्यंत ह्रदयस्पर्शी भावना,कविराज.

    ReplyDelete
  3. हृदयस्पर्शी.

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर 👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे