!!अन्नदान!!
दानात दान श्रेष्ठदान
देईल जो अन्नदान
होईल तोचि पुण्यवान
वाढेल त्यांची शान.
म्हणतील त्यासी कीर्तिवान
जाणुन दुःख गरिबांचे
फिटतील पांग त्यांचे
मिळतात आशीर्वाद अश्रीतांचे.
कार्य पुजे समान
कमवतो जे धन
त्यातून दयावं थोडं
प्रसन्न होतं मन.
पुण्य मिळतं स्वर्गाच
वाढते लक्ष्मी घरची
मिळते बुद्धी सरस्वतीची
वाढेल पुण्याई आईवडिलांची.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055©️®️
.jpeg)
Comments
Post a Comment