कोजागिरी ( क्र 2 )✍️
!! कोजागरी पौर्णिमा !!
लक्ष्मी अवतरे धरणी
बळी पुजन करुनी
साजरी करतं पौर्णिमा
दुध सारं आटवुनी.
मिसळत केसर पिस्ता
बदाम चारोळी वेलदोडा
मध्यरात्री उत्सव सारा
पाहुत चंद्र कडा.
आणुन धन धान्य
नैवेद्य नवान्न पौर्णिमेला
नावं विविध देशात
प्याला पिवु आटवलेला.
दुध पळवे आजाराला
उत्सवात गोडवा भरलेला
थारा नसे दुःखाला
सुरवात वातावरणात शीतलतेला. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment