चित्र काव्य ✍️ ( क्रमांक 2 )
!!पिण्याचे पाणी!!
गावा पेक्षा लांब
रखरखते पडे ऊन
स्रिया आणत पाणी
होत्या साऱ्या गुणी.
मैत्रिणी जमतं विहरीवर
घरी सोडुन पोर
पाण्याचा असे घोर
चिंता लागे फार.
आणत कुटूंबा साठी
धरतं घागर मोठी
संसार थाटे छोटी
मनं नसतं खोटी .
जीवन असतं जल
येतेच चाले खल
जरी शरीर कोमल
जमतं गोपी विमल.
घेत डोक्यावर पदर
त्यावर असे हंडा
उडवत नाकाचा शेंडा
घराला लावे कडिकोंडा
उन्हात जाये माय
काढून दुधाची साय
गोठ्यात राही गाय
अनवानी असतं पाय.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


Comments
Post a Comment