पितृपक्ष
आला आला पितृपक्ष
जेवु घालणे लक्ष
करू आत्मा शांत
पूजाअर्चना ठेवु लक्ष.
आठवण करू त्यांची
दाखवली सृष्टी आम्हालाच
आहे आज त्यांचंच
खाऊ घालतोय तुम्हालाच.
करू सेवा त्यांची
मिळेल छान मेवा
ध्यास हाच हवा
आठवणींचा हा ठेवा.
गाय, मासा , कावळा
प्रतीक सृष्टी जीवांचे
खाऊ घालु त्यांना
पोट भरेल पूर्वजांचे...
लाभेल पुण्य जीवाला
कार्य पोहचेल शिवाला
सुख, शांती, लक्ष्मी
येई आपल्या घराला.©️®️
![]() |
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055

Mast
ReplyDelete