खेकडा ✍️
!! खेकडा !!
दश पाद प्राणी
नदी समुद्र काठ
असे त्याचा अधिवास
जीव असतो खास.
प्रजनन काळ येता
सुरक्षित निवडता जागा
धरती कडे वळता
खडकाळ शोधता धागा.
मानवास देता दिशा
संकट सूचक सारे
भरती ओहटी सांगता
दाखवतात वाहणारे वारे.
ऐकोप्यात सारे असता
शिसस्थित सारे चालता
वाट रांगेत काढता
समुद्रात सारे पळता.
अभ्यास कोण करतो
चक्र माणुस फिरवतो
स्वयंपाकी कढईत तळतो
मसाला रंस्यात फिरतो.
नांगी असतात यांना
काढतात ते चालतांना
पाठी कठीण कवच
छान दिसता पळतांना.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


खूपच छान खेकड्याचे वर्णन. 👌👌👌👌👍
ReplyDelete