परिचयपत्र ✍️
साधारण पाच सहा वर्ष्या पूर्वी मला एका संस्थे कडून. "सर आपला परिचय पाठवा".असं सांगण्यात आले. मी नाव गाव पत्ता पाठवला. सर तसं नाही आपण आजपर्यंत सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रात केलेले कार्य सारं लिहून पाठवा. तसंच कोणत्या कोणत्या पदावर होते आहेत ते लिहा. तुम्ही कसं जीवन जगलेत आज पर्यंत ते सारं लिहून पाठवा. सर्व परिचय पत्रात आलं पाहिजे. त्या नुसार मी माझं परिचय पत्र ग्रामीण भागात गणपूर गावात कसं जगलो जगतोय माझं कार्य लिहून काढलं. ते असं आलं.
परिचय.
नाव :- प्रदीप मनोहर पाटील
पत्ता :- मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा. जिल्हा. जळगाव. पिन.425108
मोबाईल. नं 9922239055
शब्ददिप ब्लॉग https://shabdhdeep.blogspot.com/2022/10/blog-post.html. .
ब्लॉग वर स्वतः लिहलेलं साहित्य टाकतं असतो.
ई मेल.
शिक्षण : आय टी आय इलेक्ट्रॉनिक. बी कॉम
व्यवसाय :- शेती
साहित्यिक परिचय:-
1) अक्षरधाम अंक
सात कवी मिळून कविता संग्रह.
2)अक्षरधाम अंक
पाच कवी मिळून कविता संग्रह.
3)अक्षरबाग
एकवीस कवी मिळून कविता संग्रह.
4)अनेक दिवाळी अंकात लेख, कविता प्रसिद्ध होत असतात.
5) नियमित बऱ्याच दैनिक मध्ये लेख, कविता प्रसिद्ध होत असतात.
6)खुप वॉट्सअप ग्रुप वर चारोळ्या, कविता, लेख लिहलेत तेथील स्पर्धेत सहभाग राहायचा.
7) ग्रुप वरील काव्य लेख लेखन स्पर्धेत 100 वर प्रथम, द्वितीय, उ्तेजनार्थ बक्षीस प्रमाणपत्र मिळालेत. (सध्या तेथे लिखाण थांबवलं )
8) राज्य स्थरीय पत्र लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक.
9)अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महा. राज्य आयोजित "माय मराठी " कविता निवड संग्रहात प्रसिद्ध. सत्कार आयोजन.
10)अनेक राज्य स्तरीय कवी संमेलन मध्ये कविता पाठ्वल्यात पाठ्वत असतो. त्यात सहभाग त्यातील संग्रह मध्ये प्रकाशित झाल्यात.
11) दैनिक वेब पोर्टल वर लेख, कविता प्रसिद्ध होत असतात.
12)शब्ददीप प्रकाशन.
स्वतःचे प्रकाशक म्हणून प्रकाशन काढलंय. या पुढे स्वतः लिहलेले पुस्तकं, संग्रह, लिहलेल्या लेख चे पुस्तक स्वतः प्रकाशित करण्याचा मानस.
13) दैनिक मध्ये सहसंपादक म्हणून कार्य केलंय.चार ते पाच दैनिक मध्ये लेखक, बातमी,वार्ताहर, पत्रकार म्हणून काम केलंय करतोय.
14) राजकीय सामाजिक व्यक्ती तसेच साहित्यिक, लेखक, कवी म्हणून जनमानसात परिचय.
15) रेडीओ पाझरा धुळे वर लेख, कविता वाचन तेथे माझ्या लेख कविता चे वाचन करतं असतात.
16) व्ही व्ही प्याट. वर लिहलेली कविता रेडीओ पाझरा वर गायन. ती कविता नवी दिल्ली येथे निवडणूक आयोग भारत सरकार येथे वाजवण्यात आली त्यांनी तेथे मी मराठीतून गायिलेल्या रेडीओ पाझरा वरील कवितेचे कौतुक केले.
17) रेडीओ पुणेरी आवाज वर चारोळ्या खुप वेळा वाचन होत असतात .
सामाजिक कार्य
1) विविध सामाजिक संस्था संघटनेत सहभाग.
2)रक्तगट, रोगनिदान, मोतीबिंदू तपासणी शिबिरात. सहयोजन आयोजन यात नियमित सहभाग असे.
3)तरुणांना व्यवसाय मदत, अंध, अपंग, जेष्ठ नागरिक यांना सोई सवलती मिळवण्या मदत करीत राहायचो.
4) वृक्ष लागवड.. दर वर्षी कार्यक्रम सहभाग. गावात विविध संस्थेत तालुक्यातील तसेच स्वतःच्या शेतात बांधावर रस्त्यालगत वृक्ष लागवड करून ते जगवण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. फळे, फुले, वृक्ष लागवड करून जोपासण्याची आवड.
5) गरीब अशिक्षित शेतकरी शेतमजूर यांच्या अडिअडचणी सोडवायला नियमित तत्पर . आर्थिक, सामाजिक अडचणीत सुखदुःखात मदत.
6) गावातील विविध सामाजिक कार्यात सदैव सहभाग.
7) राजकीय शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यात सदैव सहभाग .
राजकीय स्वरूप 1) शिक्षण करतं असतांना शाळेत कॉलेज मध्ये विविध उपक्रमात सहभागी.
2) कॉलेज शिक्षण करीत असतांना राजकीय पक्ष्यात सहभाग.
3) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकार कडून नियुक्ती.
4) मा. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गणपूर चेअरमन,सदस्य.
5)मा. ग्रामपंचायत सदस्य गणपूर.
6) मा. चोपडा सहकारी साखर कारखाना संचालक.
7) मा. चोपडा तालुका मराठा बहुउद्धेशी संस्था संचालक.
8) चोपडा तालुका ग्राहक फाऊंडेशन तालुका चिटणीस.
9) राजकीय पक्ष्यात गाव, तालुक्यातील विविध संस्था, सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय पक्ष्यात गाव.तालुका स्तरावर पद भूषवलीत.
डॉ कलाम फाऊंडेशन कडून नुकतेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर कविता लिहली म्हणून कौतुक आणि प्रशस्तीपत्र पाठवण्यात येणार आहे.
हा झाला आजपर्यंत जीवन कारकीर्द चा ग्रामीण परिस्थिती प्रमाणे अल्पसा लेखाजोखा. लिहून ठेवावं वाटले म्हणून लिहून ठेवले.

Comments
Post a Comment