स्वच्छ भारत ✍️
!! स्वच्छ भारत !!
मन करू निर्मळ
माणसं सारी प्रेमळ
करा आईवडिलांचा सांभाळ
जरी भरलं आभाळ.
घर करू स्वच्छ
काढु त्यातील घान
अंगणी रांगोळीला मान
संस्कृतीची हिच शान.
गावात लावु वृक्ष
जलसाठा ठेवु लक्ष
नको जातपात पक्ष
निर्मळ भारत लक्ष.
शिकवण गाडगे बाबांची
फेकु लक्तरं अंधश्रद्धेची
जोपासु नीतिमत्ता माणुसकी
कास स्वच्छ अभियानाची. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर. ता. चोपडा. जिल्हा. जळगाव
पिन. 425108©️®️
.jpeg)

Comments
Post a Comment