घुबड ✍️
!! घुबड !!
निशाचर असते घुबड
किटाणूचं माहेर घर
मान फिरवते भरभर
फिरवतं डोळे गरगर.
राहते उंचावर फार
जंगलात असते दुर
निर्जन स्थळ निवास
रात्री भक्षण खास.
अशुभ म्हणतात काही
लक्ष्मी मानतात बाई
म्हणता फेकला दगड
उगळत ती राही.
अंडी देते घुबड
अघोरीं मानतात फळ
मन ठेवा निर्मळ
जीवनात येतो सुकाळ.
दर्शन झालं दुर्लभ
मला रोज लाभ
वसलंय सारं कुटूंब
दिसता नियमित सुलभ.
राखाडी रंग भुरा
मनाचा खेळ सारा
शुभ अशुभ मारा
नशिबाचा असतो फेरा.
कीर्द अंधाऱ्या रात्री
आवाज घुमे रानात
धडकी भरे मनात
प्राणी सावध बनात.
उडता आहे पक्षी
राहणं तिचं लक्षी
शांत भासे दिसें
वाटतो रान रक्षी. ©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव.


Chhan,,
ReplyDeleteSuperb 👌👍
ReplyDelete