प्रकाश पर्व ✍️
!! प्रकाश पर्व !!
नको माणसात गर्व
पडतो रोजच अंधार
दिवसाचा तो उजेड
येतो रात्री अंधार.
जसी ऊन सावली
जीवन तोचि खेळ
बसवु आनंदी मेळ
पाडू चोहीकडे उजेड.
येऊ देत अंधार
स्वागत करू त्याचं
लावु आकाश कंदील
सांगु स्वागत उजेडाचं.
अंगणी सडा रांगोळी
दिव्यात तेल टाकु
संपवू अंधाऱ्याचा खेळ
बसवु प्रकाश मेळ.
उधळू दारू गोळा
बघतं चांदण्यांचा मेळा
चंद्र तारका खेळा
फुलपाती कोठी उजेडा.
काडीपेटी रॉकेट सापगोळी
उडवत फुलभाजी नळी
भरवत मुलांचा खेळ
टिकली बंदूक गोळी.
अवतरु प्रकाश पर्व
घालवू अंधार सर्व
करू दिव्यांची आरास
पुजु धान्य रास.©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


सुंदर अती सुंदर
ReplyDelete