वसुबारस ✍️
!! वसुबारस !!
सुगी आली खास
पडली धान्य रास
पसरला सुगधं सुवास
आनंद मानव जीवास .
पुजन करून देऊ
संन्मान गाय वासरास
उत्सव शेतकऱ्यांचा खास
सुरवात एकत्र येण्यास.
मिळून सारं कुटुंब
साजरा करतं सण
भरे साऱ्यांचं मन
कमवत कष्टाचं धन.
संपवू सारा अंधार
अवतरु प्रकाश सार
करतं आनंदी संसार
उचलतं अन्नाचा भार.
सुख समृद्धी आनंद
येऊ देत जीवनात
हिच शिकवण सणात
नवं वर्ष्याची सुरवात.
येई सण दिव्यांचा
चव चाखू नवं वानाची
पदार्थ सारी फराळाची
झळाळी सणास सोन्याची.
माणसं मोठी मनाची
सुरवात पूजा पशुची
शिकवण सारी आईची
देण हि गाईची.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
.jpg)

Comments
Post a Comment