पूर्वीची दिवाळी ✍️
!! पूर्वीची दिवाळी !!
आली आली दिवाळी
मुलांची फुले कळी
सुट्टीची मजा थोडी
जात सारे आजोळी.
गाडी येई घ्यायला
आनंद होई आईला
घास मिळे गाईला
पारा नसे सुखाला.
कपडे नवे घालायला
सुट्टी मिळे अभ्यासाला
मजा येई जेवायला
गोड मिळे खायला.
चकली, फराळ, लाडु
नाश्त्याला सर्वांना वाढु
खेळ मैदानी खेळू
भिडू आपले निवडू.
लावु फुलभाजी वात
आनंद साऱ्या घरात
सडा रांगोळी दारात
जगत सारे सुखात.
जात लांब शेतात
फिरतं झाडा झुडपात
देत एकमेकांना साथ
दिवस सुखात जात.
माणसं साधी भोळी
पहाटे कोंबड्याची आरोळी
उठतं रोज सकाळी
आजी वाढे पुरणपोळी.
मजा दिवाळीची भारी
आनंद गगनात भरी
तोरण लागे दारी
मजेत दिवस सारी.©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Khrach tya veli yaychi diwalDichi majja
ReplyDeleteधन्यवाद 👏
ReplyDeleteछानच
ReplyDelete