जल चक्र ✍️
!! जल चक्र !!
पृथ्वी वरचं पाणी
असतं सारं गुणी
जीव जगतो त्यातुनी
सूर्य घेतो शोषूनी.
बाष्प फिरतं आकाशातूनी
ढगांचा होतो पसारा
सुटला गार वारा
वरती टकराव सारा.
आदळ आपट मारा
कधी पडतात गारा
कधी पाऊस धारा
घर्षनाने वीज मारा.
पुन्हा पृथ्वी जलधारा
चक्र अविरत फेरा
सृष्टी फुलते त्यावर
जीव जगतो सारा.
अंकुतरते बीज अचल
जमीन भुसभुशीत कोमल
कुठं होतो चिखल
समुद्र होतो फुल्.
जल चक्र सारं
पंचतत्वतील घटक सारे
फिरवतात सारं वारे
साम्राज्य सृष्टी उभारे.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Nice
ReplyDelete