गिधाड ✍️
!! गिधाड !!
सर्वात मोठा पक्षी
मृत माउस भक्षी
दुर्मिळ झाले आता
लोकं आहेत साक्षी.
नष्ट होताय जाती
आकाशी भरारी यांची
धडक विमानाशी होते
दशा होते त्यांची.
नजर दुर ठेवतो
थव्यात छान राहतो
मसनात भक्ष शोधतो
मृत मानवासही खातो.
नर मादी सारखे
अंडी वर्ष्यातून एकदा
अभ्यास करू ज्ञानदा
अटलांटाते आशिया खंडा .
उपयुक्त असतात प्रजाती
सृष्टी सर्वांना सांभाळती
जोडु प्राण्याशी नाती
होई मानव प्रगती.©️®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


छानच
ReplyDelete