काळी चिमणी ✍️
!! काळी चिमणी !!
राहि रानात पक्षी
आग दिसते कुठं
अवतरते ती तिथं
फोडतं नाही कंठ.
आग सोसून घेते
म्हणून काळी दिसते
शरीर करते गरम
अग्नी का शोषते.
असं दिसते कमी
आगीवर उडण्याची हमी
धुरात करते मजा
पाहतो तुम्ही आम्ही.
जगण्याची तऱ्हा न्यारी
दिसते काळी भारी
पक्षी आहे तरी
शोधता तिलाही अघोरीं.
राखेतून घेई भरारी
जीव दिसतो कष्टकरी
किमया आहे सारी
शिकारी ईलापण मारी.
प्रजाती आहे चिमणी
राहता राजा राणी
थव्याने दिसतात कधी
शांत दिसते गुणी.©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


छान
ReplyDelete