मन आनंदी ✍️
!!मन आनंदी!!
मन आनंदी गडे
फिरतंय ते चोहीकडे
वाजवत सनई चौघडे
शांती आत्म्यास मिळे.
थंडीत शरीर कुडकुडे
शेकोटीत ऊब कळे
जीवन निरोगी मिळे
हृदय जोरात पळे.
डोळे भीरभीरत सगळे
सृष्टीस स्पन्दन कळे
दृष्टीत मोहिनी पडे
भासे थोडं वेगळे
विचार पडतात तोकडे
सुविचार ठेवु मोकळे
सुगधं दरवड चोहीकडे
आनंदी राहु सगळे.
आशीर्वाद वडील धार्यांचा
आदर करु मतांचा
साथ संगीत सुरांचा
आनंद एकत्रित राहण्याचा.
नको बनु भुंगा
मन ठेवु चंगा
पावेल सदविचाराने श्रीरंगा
घरात राहील पांडुरंगा.©️®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment