आमदार ✍️
!! आमदार !!
आमदार होण्या फिरतोय
भाऊ सर्वांच्या दारोदार
सांगतो कामं फार
निवडायचा करा विचार.
आज करतोय प्रचार
पाया पडतोय तुमच्या
मला बनवा कारभारी
शिक्का फुलीवर आमच्या.
सांगतोय करेल कामं
आज करतोय रामराम
पाच वर्ष बघेल
वापरेल साम दाम.
आज मी फिरतोय
मग तुम्ही फिरा
मारा माझ्याकडे येरझरा
नाही सापडणार घरा.
साहेब मी बनेल
रक्त तुमचंच सोषेल
घर माझंच पोसेल
संम्पत्ती माझीच वाढवेल.
करेल मी मजा
मीच तुमचा राजा
तुम्ही माझीच प्रजा
देईल तुम्हाला सजा.
सर्वच तसे नाही
पण बरेच असे
लोकांना सारं दिसें
तरी जनता फसे.
सांगतोय मी लोकभावना
कुणाला दुखवायचं नाही
चांगलं तुम्ही वागा
जनता सारं पाही.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment