रतनजी टाटा ✍️
!! अनमोल रत्न !!
साधी रहाणी त्यांची
उच्च विचार सरणी
कीर्तिवंन्त विश्व धरणी
उच्चं त्यांची करणी.
दानशूर असं व्यक्तिमत्व
पाळून सारे तत्व
दुःखीता बद्धल ममत्व
आठवणीत राहील कर्तृत्व.
करतं विचार जनतेचा
ठसा उमटला त्यांचा
घेत भरारी उधोगाची
जगात दरारा टाटांचा.
जपून सारं नितिमूल्य
वाटतं सर्वांना पितृतुल्य
हरपला देशाचा हिरा
होते व्यक्ती बहुमूल्य.
स्व कर्तुंवावर त्यांनी
केले समूहाचं नेतृत्व
वारसा चालवला वडिलांचा
स्वीकारत दुःखीतांचे पालकत्व.
घेत उंच भरारी
व्यक्ती होते करारी
आवडले देवालाही टाटा
गेलेत सोडुन देवदारी. ©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मो. 9922239055

खूप सुंदर दादा 👌
ReplyDelete💐माणसातला देव हरपला 💐
आज खरंच दुःख वाटतेय की आपलंच जवळच कुणी गेलं आहे असा भास प्रत्येक भारतीय नागरिकांना होत असेल अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही.
भारताची ही उणीव कधीच भरून न निघणारी आहे 🙏
परमेश्वरानी पुन्हा त्यांना धरती वर जन्म द्यावा हिच
भगवान
श्री कृष्ण चरणी आत्मीय समर्पित भाव अर्पण करून🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐माणसातला देव हरपला.
दादा खूप सुंदर कविता 🙏
खूपच छान शब्द रचना 👌
Deleteसुंदर काव्य
ReplyDelete