घोडा ✍️

                               !!घोडा!! 


प्राणी आहे संस्थन 

मानवाचं पाळीव धन 

पाहुन भरतं मन 

वापरणं असते शान.


शाखाहारी आहे प्राणी 

असतो तो बहुगुणी 

बंग्गीत बसता राजाराणी 

जात स्वारी करुनी.


घोडा घोडी नरमादी 

देता शिंगरू बछडा 

जगता तीस ते सोळा

धावण्याचा रेस सोहळा.


लावता शर्यत यांची 

करमणूक होते माणसांची 

विष्टा लिद खत 

पोत सुधारे जमिनीची.


राज्यांचा कीर्ती सोहळा 

सोडत अश्वमेद घोडा 

अडवे त्याला कोण 

करतं त्यास आडवा. 


जगतो मालका साठी 

 लावत लगाम स्वार 

असते पळण्याची धार 

करतं शत्रूवर वार.


गुण असतात छत्तीस 

खोड असते काहीत 

लपवत चिन्ह केसात 

करता मालकाचा घात. ©️ ®️


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे