पाणी ✍️
!!पाणी!!
द्रव पदार्थ पाणी
असतं बहू गुणी
बनलंय रेणू संयुगातुनी
जीवन चाललंय त्यातुनी.
हायड्रोजन दोन अणू
ऑक्सीजन एक अणू
दोघांच्या अणू मिळून
बनलाय पाण्याचा रेणू .
जीव जगता पाण्यावर
नाचत जीवन गाण्यावर
रेंगताय सारे पृथ्वीवर
जल साऱ्यांचा तारनहार.
घटक जीवन तत्वाचा
असतो जीवनात महत्वाचा
पालक साऱ्या जीवांचा
मालक एकात्तर टक्क्याचा. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


Comments
Post a Comment