नवं वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा ✍️
!! नवं वर्ष्याच्या शुभेच्छा !!
नवं वर्ष्याच्या शुभेच्छा
पूर्ण होवोत ईच्छा
सुख समृद्ध आरोग्य
मिळो हिच सदिच्छा.
हर्ष येवो जीवनात
समृद्धी येवो घरात
लक्ष्मी सरस्वती कुलस्वामिनी
कृपा व्हावी संसारात.
इच्छा आकांश्या पूर्णहोवोत
जुळो चांगली मित्र
आनंद दरवडो चोहीकडे
नित्य आराधना सत्र.
सुखात होवोत गर्क
सत्य अहिंसा मार्ग
मनन चिंतन अध्यात्म
गाठू सार्यांनी स्वर्ग.
सद्विचार येवो अंगी
स्वागत करोत जंगी
नातं सृष्टी संगी
होवोत सुखात दंगी.
कीर्ती पसरो आपली
जीवनात भरो सुकाळ
भजन कीर्तन प्रातंकाळ
सुमधुर संगीत सांजसकाळ.
नित्य येवोत सुक्षण
हसरं राहो मन
शांती हेची धन
जीवनात आनंद निर्माण.
आपले आणि कुटूंबाचे
असेच जोवोत दिवस
नको कधी त्रास
विश्वात सुखाचा घास. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.



Comments
Post a Comment