थंडीचे दिवस क्र 1✍️
!! थंडीचे दिवस !!
चला शेकोटी पेटवू
कचरा करू गोळा
भरवू गंप्पांचा मेळा
रंगवत मैत्री सोहळा.
पाण्याचं झालं बर्फ
जीवन झालं सार्थ
करू थोडा परमार्थ
वृक्ष्यांना कळला मतितार्थ.
वाजवू लागले धुन
येणार पुढे ऊन
पालवी लागली गळू
शेतकऱ्यांना लागली कुणकुण.
संपला सारा पावसाळा
करू लागली पेरणी
ओल सुकण्या पूर्वी
बीज उगवे धरणी.
पडेल थंडीत ओस
गारवा पसरेल कोसनकोस
धान्यांची पडेल रास
सुख मिळेल जीवास.
ऋतू थंडिचा छोटा
जीवांना उष्णतेचा तोटा
करू पाण्याचा साठा
उन्हाची पुढे भीषणता. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव

Comments
Post a Comment