थंडीचे दिवस ( क्र 2 )
!! थंडीचे दिवस !!( क्र 2)
थंडी पडली खुप
थिजलं सारं तुप
पावसाचं वाजलं सुप
पडेल पुढे धूप.
ऋतू चक्र सारं
फिरतं सारं भरभर
जीव रेंगता पृथ्वीवर
दिवस सरता सरसर.
वृक्ष्यांनी सोडली पालवी
नवं मुळाना पसरवी
ऊन त्यास आठवी
पाणी आत साठवी.
शेतकऱ्यांची बीज पेरणी
पिकं येई धरणी
सारी निसर्गाची करणी
फिरतं रानांत गोफणी.
पशुपक्ष्यांची असे किलकिलाट
उगवे गारगार पहाट
शेकोटीवर गप्पांचं रहाट
ओसाने भिजे पायवाट. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment