समुद्र तळ क्र 3✍️
!! समुद्र तळ !!
पृथ्वी वरील दरी
असते खोल परी
सुंदर भासते खरी
वावरते त्यात जलपरी.
समुद्रसपाटी खोल पृथ्वीतळ
जलाचं असे तळ
तेच समुद्र तळ
असतं सारं निर्मळ.
साचला तेथे गाळ
मग बनलं प्रवाळ
उगम जीवांचा तेथून
सुरवात उगवलं शेवाळ.
काठावर आलं लव्हाळ
अचल जीव वाढ
सुष्म जीव वाढ
जलचर सुरवात सुकाळ.
मिळाली सारी तत्व
जुळलं सारं सूत्र
जीव निर्मिती पवित्र
आलं जीवांचं सत्व.©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


Comments
Post a Comment