उकिरडा ✍️
!!उकिरडा!!
विष्टा असते जीवांची
वस्ती सारी किटाणूनची
किमया सारी पंचत्वाची
ऊर्जा त्यात जीवाची.
जीव निर्मिती यातून
निघता अचल मातीतुन
निर्मिती सारी आतुन
चल अचल जीवातून.
पृथ्वीत सारी ऊर्जा
जगतो तिजवर सर्जा
होतो जीव राजा
करतो तिजवर मजा.
एकरूप जीव प्रजा
शरीर धारण वेगवेगळी
एकजात सारी निर्मिती
कृती आगळी वेगळी.
चलाची असते विष्टा
अचल निव निर्मिता
चल अचल खाता
एकमेकांवर चलअचल जगता.
पृथ्वी जीवांची माता
मिळते ग्रहाची ऊर्जा
ग्रह अशःत पिता
उकिरडा जीवांचा निर्मिता. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108

Comments
Post a Comment