कोंबडी ✍️
!! कोंबडी !!
बांग देई कोंबडा
जागं करी पहाटे
छान प्रसन्न वाटे
मग तांबडे फुटे.
सुरवात करे दिवसाची
कोंबडी मारत नवसाची
अंडे रोज खाण्याची
जीवन सत्व जगण्याची.
मांस अंडी देणारा
जीव आहे गुणी
अंडी की कोंबडी
पहिले सांगा कुणी.
अंड देई कोंबडी
पाळतात खुप गडी
कोंबड्याचा असतो तुर्रा
पकडतो घाणीत किडी.
पक्षी आहे जीव
येते यांची कीव
जीवन सत्व भरीव
विष्टा पिकास संजीव.
खुऱ्हाड्यात असते जागा
पहाटे आवाजाला पारखे
नर मादीत फरक
अंड असतात सारखे
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


Comments
Post a Comment