खारुताई ✍️
!! खार !!
खार असते सुंदर
भुक भागवते फळावर
फळाचा खाते गाभा
सरसर चढे वृक्ष्यावर.
कुरतडे साल झाडाची
सवय बिया पुरण्याची
करते वृक्ष लागवड
किमया रानात ईची.
घाबरट आहे जात
मऊमऊ केसाळ पशु
महाराष्ट्राचा प्राणी शेकरू
प्रजाती लागल्यात दिसु.
शांत संयमी राहते
सर्वीकडे बघा दिसते
प्रजाती आहेत दोन
धावतांना धांधरट वाटते .
घाईत पळण्यात चपळ
शेपूट करते वळवळ
राखाडी भुरा रंग
जगाची तिला कळवळ.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


Comments
Post a Comment