महात्मा ✍️
!! महात्मा !!
राष्ट्रपिता महात्मा गांधी
शांत संयमी नेतृत्व
गाजवत आपलं कर्तृत्व
मिळवत शरीरावर प्रभुत्व.
महात्मा पदवी दिली
स्वतंत्र सेनानी नेताजींनी
सार्थ ठरवली गांधीजींनी
अहिंसा अंगिकारली त्यांनी.
पर्व गाठले स्वतंत्राचे
आदरणीय नेते भारताचे
ठसा उमटला चलनावर
राज्य लोकांच्या मनामनावर.
साधी रहाणी उंचविचार
हाच जोपासला जीवनसार
पाहुन दुःख जनतेचं
पंचा नेसत अंगीकार.
चरखा चालवत नियमित
उपदेश देतं पर्णकुटीत
फिरले स्वतः काठीत
वार सोसत पाठीत.
सत्याग्रह करतं आंदोलन
उल्थवली इंग्रज सत्ता
झाडली गोळी टेकवत माथा
बिघडली माथेफिरुची नीतिमत्ता.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा.
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment