भुंगा ✍️
!! भुंगा !!
भुंगा आहे कीटक
बघतो कसा एकटक
शरीर असतं काटक
कोरतो कसा टकटक.
सहा असतात पाय
पंख त्यास दोन
उडतो फुल पान
पायाला मद छान.
करतो फुलांचं परागीकरण
पानांना आवळून तोरण
जाती प्रजाती अनेक
उडतांना किरकिर करण.
भुंगा शोधतो फुलं
बघतात त्याला मुलं
लागते त्याला चाहूल
देतो छान हुलं.
सुंदर भासतो पक्षी
प्रजाती त्याची कीटक
उपमा देतात माणसाला
प्रवृत्ती ज्यांची घातक. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


वाह बहोत खूब सुंदर! मस्तच! 👌🏽👌🏽
ReplyDelete