जलचक्र ✍️
!! जलचक्र !!
सूर्य सारं करतो
किरणं येतात पृथ्वीवर
वातावरण होतं गरम
बाष्प जातं वर.
तापू लागतं पाणी
असतं सारं बहुगुणी
पाण्यास मिळते धुनी
जातं सारं उडूनी.
होतं त्याचं बाष्प
बनतात वरती ढग
येते त्यांना रग
थंड मिळते झाग.
वाजतो पाऊस जलराग
करतं वीज कडकडाट
वाऱ्याचा सारा सुळसुळाट
पाण्याचा वाहतो पाट.
नदीस येतो लोट
पुराचं भरतं पोट
समुद्र भरतो अलोट
क्षेत्र होतं पाणलोट.
चक्र फिरतात सारी
किमया वाऱ्याची भारी
जल अदृश्य करी
घेत आकाशात भरारी.
जल वायु अग्नी
खेळ सारा त्यांचा
भ्रमण सतत वातावरणात
तारणहार साऱ्या जीवांचा. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment