पृथ्वी आणि जीवसृष्टी
!!पृथ्वी आणि जीवसृष्टी!!
पृथ्वी आहे गोल
तिचंच असे मोल
जल वायु अग्नी
माती उंच खोल.
पंचतत्व सारी पृथ्वीवर
जीवांचं निर्माण घर
रांगू लागली धरणीवर
फुलला पसारा वर.
सुष्म असतात मातीत
करतात घटक विघटित
मोठे गिळतात छोटी
सारे समावतात मातीत.
जीवसृष्टी खेळ सारा
फिरवते सारं पृथ्वी
ऊन वारा पाऊस
चलअचल जीव आठवी.
खेळ खेळतात जीव
घर्षनाने निर्माण कण
भरतं गर्भ रांजण
भरतं जीवांचं मन.
सुष्म निर्मिती सारी
धारण करता शरीर
एकातून निर्माण दुसरा
सारा वरती पसारा.
निर्माण झाली सृष्टी
चलअचल पडली दृष्टी
चक्र सारं फिरतं
जीवचक्र मातीत विरतं .
निर्माण जेथून सारं
त्यातच सारं मिसळणार
सुष्म सारा सार
आहे पृथ्वी अवतार.
माता आहे धरणी
तिचीच सारी करणी
उदर तीच भरणी
जीव फिरतात वरुनी. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव

अप्रतिम अर्थपूर्ण खूपच सुंदर! 👌🏽👌🏽
ReplyDelete