हवा ✍️
!! हवा !!
नाही दिसतं दृष्टीला
फिरवते साऱ्या भ्रम्हांडाला
जीव जगतात तिजवर
बळ देते सृष्टीला.
घटक खुप तिच्यात
ऑक्सीजन प्राण्यांच्या भात्यात
रंग नसे तिला
गधं वेगवेगळी घटकात.
कधी भासे मंद
वेगवान तिचा छंद
सुष्म जागा रुंद
सामावते जागा अरुंध.
समाविष्ट साऱ्या कक्षेत
सुष्म तीच रूप
अनंत वायु स्वरूप
त्यातील ओझोन प्रारूप.
जीवांना आहे संजीवनी
निर्मिती घटक तीच
सुष्म जीव रूप
चालवते सृष्टी हिच. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108

Comments
Post a Comment