अग्नी ✍️
!! अग्नी !!
जाळ होतो अग्नी
असतो मंद गुणी
तीव्र रूप त्याचं
भस्म होतं त्यातुनी.
राख उरते आगीतूनी
जाळते जीव तत्व
लाकूड रॉकेल गॅस
स्वयंपाक खाद्यात महत्व.
असतं पंचतत्वातील तत्व
असतं तोवर सत्व
सुष्म कणात समाविष्ट
जीवात असतं अस्तित्व.
अग्नी म्हणजे ऊर्जा
जगते त्यावर प्रजा
मिळतो त्यातून उजेड
जीव होतो राजा.
आगीत दडलाय सार
कुठं करतो भस्मसात
देतो सजीवांना साथ
बनतो जगण्याची वात.
गुण आगीचे अनंत
पूजतात आगीला संत
होता त्यातून कीर्तिवंत
ठेवते साऱ्यांना जिवंत. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment