वायु ✍️
!! वायु !!
हवा म्हणजे वायु
घटक अनेक त्यात
प्रकार वाटतात सात
वाहतात दिन रात.
पृथ्वीवर वाहतात सर्वदूर
जीवांचा हाच सूर
मंद असतो मधुर
वादळात येतो महापूर.
भ्रमण सतत असतं
जीव जीवनात दिसतो
घटक महत्वाचा असतो
सुष्म हा भासतो.
दिसतं नाही डोळ्यांना
फुलवतो रात्री कळ्यांना
सुख देतो जीवांला
सोडतो कधी जीवांना.
महत्व याचे अनेक
वायु असतो नेक
घटक पंचतत्वातील एक
सुष्म असेल सुरेख.
असतो मिसळतो सर्वात
थंड उष्ण वात
देतो जीवास साथ
वातावरण पृथ्वी पर्वात. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108

Comments
Post a Comment