हृदयातील खरं प्रेम ✍️क्र 2
!! हृदयातील खरं प्रेम !!
खरं प्रेम देतात
आई वडील आपले
हट्ट पुरवत बाळाचे
शरीर त्यांच थकले.
दिसु देतं नाही
स्वतः भोगलेल्या यातना
नियमित सुरु असते
मुला साठी प्रार्थना.
जीव असतो तोवर
काळजी असते मुलांची
भुकेली असतात ती
आपल्या मुलांच्या प्रेमाची.
हृदयात स्पन्दन त्यांची
धडपडता मुलांच्या साठी
जेवता स्वतः शेवटी
झोपता उपाशी पोटी.
लागते जरी काठी
विचार घेऊन पाठी
येते जरी साठी
जीवन जगता मुलांच्यासाठी.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment