तितर ✍️
!!तितर!!
राम, सफेद, जंगली
चकोर,काळा, हिम तितर
जाती अनेक पक्ष्याच्या
सुदंर प्रजाती हितर.
नर देतो बांग
मादी घालते अंडे
झुडपात राहण्याची जागा
राखाडी यांची शेंडे.
दाणे टिपतो पक्षी
ठेवून कुटुंब साक्षी
पिलांना मादी रक्षी
पाळतात काही पक्षी.
खरडून टाकतो जमीन
खड्यात घालतो अंडी
उबवते त्यास मादी
देऊन चार आठ अंडी.
घालते पिलं जन्माला
राहतात माळ रानाला
आवाज गोड मनाला
स्वादिष्ट लागे खाण्याला.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment