संदेश एकतेचा ✍️
!! संदेश एकतेचा !!
घर विश्वची साऱ्यांचे
होऊ आपण राजे
देव देहात वसे
मन मंदिर माझे.
ठेवु निर्मळ मनाला
प्रेम संदेश जीवाला
जागा ठेवु भावनेला
सांगणं मानव जातीला.
तडा नको एकतेला
प्रणाम भु मातेला
मदत स्नेह बंधुता
अंगीकारू सार्यांनी शांतीला.
देव साऱ्यांचा एकच
जात धर्म पंथ
दिलं रूप वेगवेगळे
सांगतात सारे संत.
धर्म ग्रंथ वेगळे
संदेश देतात सगळे
नको भेद भाव
शरीर जरी वेगवेगळे.
वागण्यात ठेवु गोडाई
कमवू कर्म पुण्याई
जात पंथ धर्मात
मानवाची एकतेत भलाई.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment