शिवजयंती ✍️




                            !!शिवजयंती!!


राजे शिव छत्रपती 

वापरली गनिमी युद्धनीती 

घेऊन मावळे सोबती 

ठेवली सद नीती.


वाचवल्या महिलांच्या इज्जती 

पाळून साऱ्या रितिभाती 

फिरवली भवानी तलवार 

तोफगोळा गनीमा वरती.


वाचवल्या शेतकऱ्यांच्या शेती 

जपत सारी  नाती 

निर्मिले गड किल्ले 

 मंदिर मस्जिद राजधानीवर्ती.


शूर पराक्रमी राजा 

राज्य रयते वरती 

मोडत पातशाही देशात 

फडकवला ध्वज किल्यांवरती.


राजे अवतरले शिवनेरी 

स्थापून स्वराज्य जनतेचं 

मृत्यू आला रायगडी 

लिखाण औचित्य शिवजयंतीचं .©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव.



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे