कुणाचं घर ✍️
!! कुणाचं घर !!
घर असतं माणसाचं
मानतो तो स्वतःचे
भ्रम असतो सारा
वास्तव्य त्यात किटकांचे.
मुंगी वावरते चोहीकडे
पाल पकडते किडे
उंदीर पोते कुरतडे
घूस माती काढे.
कोळी विणतो जाळे
पकडतो छोटी किडे
चिमणी घरटं करे
कबुतर जागा निवडे.
पक्षी कीटक किटाणू
हक्क दाखवता सारी
वास्तव्य सर्वांचे भारी
वावरतात घरात सारी.
ढेकूण शोषता रक्त
डास मारता डंक
कितीही वाजवा शंख
राजा असो वा रंक.
कोण नेतं वर
साऱ्यांचा त्यात वावर
म्हणतो माझं घर
दाखवतो माणुस पावर . ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108

वाह अप्रतिम रचना
ReplyDelete