उंट ✍️

        


                             !!   उंट   !!


उंच कुबड उंटाचे 

पाय लांब त्याचे 

वाळूत रुबाबदार पणाचे 

ओझे ऊचलतो मानवाचे.


पाणी पितो टाकीभर 

साठवतो आत पिशवीभर 

ऊन पडतं वर 

दिसतो वाळवंट भर.


प्राणी आहे काटक 

केस मऊ अंगभर 

थंडी उबेत जीवनभर 

शरीर त्याचं वर.


जगणं त्याचं अर्धशतक 

प्राणी वाळवंटातील रुबाबदार 

पाठीवर चरबी मदार 

मास खाण्यास चवदार 


उपयुक्त प्राणी हा 

जगतो शांत पहा 

पाणी देतो उन्हात 

मानव जगतो आनंदात.©️®️



प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव.



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे