चित्ता ✍️
!! चित्ता !!
मादी चालवते सत्ता
शावक गिरवता कित्ता
शिकवते सारं काही
गाजवता जंगलात सत्ता.
ठेवतात नजर कडक
धावत पकडता शिकार
असतो वेग फार
देतं भक्ष्यास मार.
अंगावर असतात ठिबके
लवचिक त्यांची मनके
खातात शिकार मारून
देत प्राण्यांना दणके.
वेगवान प्राणी चित्ता
उघड्या रानात सत्ता
राहतो कुटुंब करून
पाळून सारी नीतिमत्ता. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 525108
.jpg)

Comments
Post a Comment