मानव एकता ✍️
!!मानव एकता!!
हिंदू मुस्लिम शिख
मानव सारे एक
वागु सारे नेक
शरीर जरी अनेक.
रक्त लाल सर्वांचे
नको बोल गर्वाचे
गीता बायबल कुराण
सारे तत्वज्ञान शिकण्याचे.
साऱ्यांचा सार एक
देव भ्रम्हांडी भरलेला
स्वरूप रूप सुष्म
जळीस्थळी वास्तवात उरलेला .
रूप त्यांची अनेक
निर्मिती सारी पंचत्वाची
परीक्षा देवु सत्वाची
भाषा सदैव प्रेमाची.
नीतिमत्ता ठेवु वागण्याची
रीत तीच साऱ्यांची
जात पंथ धर्म
फळे मिळतात कर्माची.
दया क्षमा शांती
घेत जीवनात विश्रांती
घडवू प्रेमात क्रांती
जात मानव साऱ्यांची.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.
पिन. 425108

Comments
Post a Comment