आजची लोकसेवक ✍️

 क्रूर लोकसेवक 


सालदारा सालदारा काय तु केले. जनता सारखी बहुमूल्य लोकांची रक्त पिपासू का तुम्ही जाहले.

सालदार म्हणून मालक बनून गेले.

लोकशाही ठोकशाहि बनवून टाकली. 

अनंत कर लादत गेले. रस्त्यावर चालणे मुश्किल केले.

कितीतरी प्राण गमवत गेले तुम्हा सोयऱसुतक ना उरले.

नाके बसवून पैसे हिसकावणे धंदे सुरु केले. 

सांगा जनतेची रोड चालण्या साठीची भरलेली कर तुम्ही का खाऊन टाकले.

एक गोष्टी साठी किती दा कर तुम्ही लादत गेले. जनता म्हणजे पैसे लुटण्याचं साधन तुम्ही समजतं गेले.

अन्याय अत्याचार धाक दडपशाई तुम्ही रुजवत चालले.

धर्म जाती जाती भांडणं तुम्ही लावत खुप चालले. 

पेटली जर जनता पळता भुई थोडी होईल हेच तुम्ही का रे विसरत राज्य करतात सारे.

राष्ट्र पुरुषांचा अवमान करणारे तुमीच ठेकेदार सारे.

तुम्ही मालक समजतात कारे. तुमच्या हुन कुत्री बरी रे. प्राणी हि इमानदार बाळगतात. पण सालदार तुम्ही माजून गेले. अन्याई आत्ताचारी सारी एकजूट झाले. स्वभाव तुमची अशी कशी रे.

एकजात सारी पिलावळ अशी कशी आधुनिक पुढारी लोकशाही मध्ये अवतरली रे.

देशा साठी ज्यांनी प्राण दिले त्यांची नितिमूल्य तुम्ही रोजच पायदळी तुडवतात रे.

सेवा करायला सेवक म्हणून तुम्हाला राज्य सोपवलं हि तत्व तुम्ही विसरून गेले.©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तालुका चोपडा 

जिल्हा. जळगाव.


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे