चाहूल उन्हाळ्याची ✍️
चाहूल उन्हाळ्याची
होळी पेटली रे पेटली
थंडी सारीच घटली
चाहूल उन्हाळ्याची लागली
धरणी माता तापू लागली
ओस पाण्याची सुकली
वृक्ष बहरली फुलली
मोहर सुगन्ध चोहीकडे पसरली
वेल कलिंगडाची खुलली
कणसं दाण्यांची भरली
थंडीची पिकं काढणीवर आली
रान मोकळी होऊ लागली
नदी ओस भासे सगळी
पाण्याची वानवा सुरु जाहली
आकाश निरभ्र दिसायला लागलं
सांज सोनेरी किरणांची शुभ्र
नवं आरंभ सुरवात
पाडवा अक्षय पर्व
पक्षी रानोमाळ सर्व.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment