संत एकनाथ ✍️
संत एकनाथ
शांती ब्रम्ह रूप!एकचं प्रारूप!
अवतार रूप! एकनाथ!!1
जन्मचं पैठणी! विद्या वान गुणी!
होतीच सुवाणी! धर्मज्ञानी!!2
भक्ती अंगी भिने! शक्ति रूप भासे!
प्रबोधन दिसें! वाणीतून!!3
हरी भरी पाणी! संत होते गुणी
अभंग गौळणी! रचिल्यात!!4
आदर्श वागणं! सुंदर जगणं!
साधंच राहणं! जीवनात!!5
सांप्रदाय नाथ! जनार्धन स्वामी!
ज्ञान आलं कामी! जगण्यात!!6
मी आणि तु भेद! नष्ट कर्ते झाले!
कार्य खुप केले! जीवनात!!7
प्राणी मात्रा जीव! एकच सारेच!
वाहिले वारेच! ज्ञानातुनी!!8
संत एकनाथ! उभय राष्ट्रात
सांगे अभंगात! प्रदीपचं!9©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment