विश्व जल दिवस ✍️
विश्व् जल दिवस
पंचतत्व घटक हा
जीवन जलात पहा
निर्मितीकार उगम
साठवत यास राहा.
जल वायु अग्नी सारी
सृष्टी तारी पाणी भारी
वापर करीत सारी
जीव जीवन उभारी.
संकल्प करून सारे
बांधूया बाधं बंधारे
साठा करूयात खुप
जल धारा वाहे वारे.
जीव जीवन सारंचं
पाणीच उचली भार
चल अचल सारीच
यातून जीवन सार.
यातून घेतं भरारी
वाढवु पाण्याचं स्तोत्र
सर्वदूर हेच सत्र
पाळून साठव सूत्र.
संकल्प आजच हाच
बंधिस्त करूया साठा
पशु पक्षी प्राणी मात्रा
जीव सृष्टी यात वाटा.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment